Ad will apear here
Next
'इलिट करंडक' साठी अर्ज करण्याकरता १३ ऑगस्टपर्यंत मुदत
‘इलिट करंडक’ स्पर्धेबाबत माहिती देताना संयोजिका जयश्री पेंडसे व  लायन्स क्लबचे पदाधिकारी नागेश चव्हाण, अनुराधा शास्त्री, सुधाकर कुमठेकरपुणे : 'लायन्स क्लब्ज ऑफ इंटरनॅशनल'तर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन ‘इलिट करंडक’ स्पर्धेसाठी अर्ज करण्याची मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जासोबत कॉलेजच्या आयकार्डची कॉपी असणे आवश्यक आहे, अशी माहिती संयोजिका जयश्री पेंडसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी नागेश चव्हाण, अनुराधा शास्त्री, सुधाकर कुमठेकर आदी उपस्थित होते.

हिंदी व मराठी सिनेसंगीताची ही स्पर्धा बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी कमिन्स सभागृह, पत्रकार भवन येथे होणार आहे. स्पर्धेचे हे विसावे वर्ष आहे. प्रथम येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी प्रत्येकी फिरता करंडक, रोख ५ हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे पारितोषिक आहे. दुसरे पारितोषिक रुपये ३ हजार  व स्मृतीचिन्ह, तिसरे पारितोषिक रोख रुपये २ हजार  व स्मृतीचिन्ह असे आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी रोख १ हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. सात उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण स्पर्धेच्याच दिवशी सायंकाळी साडे चार वाजता होणार आहे. 'लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल'चे प्रांतपाल गिरीश मालपाणी आणि सुनिता मालपाणी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असेही पेंडसे यांनी सांगितले.
          
स्पर्धेविषयी :
दिवस : बुधवार, १६ ऑगस्ट २०१७
स्थळ : कमिन्स सभागृह, पत्रकार भवन, पुणे
अर्ज मिळण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण :
सँडीज ट्रॅव्हल्स, पाच, अमित काँप्लेक्स, दुसरा मजला, ४७४ सदशिव पेठ, टिळक रोड, पुणे- ३०
अधिक माहितीसाठी संपर्क :
जयश्री पेंडसे : ९४२२५ ०७७२१
वसंत कोकणे : ९८२२० ८८२०१
ज्योती पेंडसे  : (०२०) २४४७१४६४/५५६९.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZTTBF
Similar Posts
सिनेसंगीतावर इलिट करंडक स्पर्धा पुणे : ‘लायन्स क्लब्ज ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २’तर्फे हिंदी व मराठी सिनेसंगीताच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या ‘इलिट करंडका’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे विसावे वर्ष आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी फिरता करंडक, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिके दिली जाणार आहेत
प्रणाली, सतीश ‘इलिट करंडका’चे मानकरी पुणे : दि असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन हिंदी-मराठी सिनेगीत स्पर्धेचा फिरता ‘इलिट करंडक’ खुल्या गटातून मुलींमध्ये प्रणाली काळे हिने, तर मुलांमध्ये सतीश शिरसाट यांनी पटकावला. ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून सीमा महाजन यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि करंडक देऊन गौरविण्यात आले
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language